करीनाच्या बाळाचा जन्म होताच औरंगजेब आणि बाबर ट्रेंडमध्ये!

करीनाच्या बाळाचा जन्म होताच औरंगजेब आणि बाबर ट्रेंडमध्ये!

मुंबई (प्रतिनिधी) : देशात नियम आणि अटींसह चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली असून, अलिकडेच अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने रविवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका मुलाला जन्म दिला. करीना आणि तिचा पती, अभिनेता सैफ अली खान हे दुसऱ्यांदा पालक होत आहेत. करीनाच्या बाळाच्या येण्याने कपूर आणि पतौडी अशा दोन्ही कुटुंबांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे.

कलाविश्वापासून चाहत्यांपर्यंत, सर्वजण कपूर आणि पतौडी या सोलिब्रिटी कुटुंबाला तथा करीना आणि सैफ या सेलिब्रिटी जोडीला शुभेच्छा देत आहेत. पण, एक असा वर्गही आहे, जिथून करीनाला ट्रोल केले जात आहे. कारण ठरत आहे, ते म्हणजे करीनाच्या पहिल्या अर्थात मोठ्या मुलाचे नाव, तैमूर अली खान. याच कारणामुळे करीना आणि सैफला काही नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेतले आहे. उपरोधिक टीका करत, तर कोणी खिल्ली उडवत करीनाने आता तिच्या धाकट्या मुलाचे नाव ‘औरंगजेब’ किंवा ‘बाबर’ असे ठेवावे असा सूर आळवला जात आहे.

करीनच्या पहिल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले होते. पण, करीनाच्या पहिल्या बाळाच्या या नावावरुन अनेक वादाच्या विषयांनी डोके वर काढले. अनेक संघटना आणि धार्मिक गटांनी या नावाचा तीव्र विरोध केला होता. करीना तिच्या मुलाचे नाव एका क्रूर शासकाच्या नावारुन ठेवूच कशी शकते असाच नाराजीचा सूर अनेकांनी आळवला होता. मात्र, करीनाच्या मुलाच्या नावाला होणारा निषेध इथंच थांबला नव्हता. अनेकांना या साऱ्याला लव जिहादचेही नाव दिले. काहींनी तर थेट करीनाच्या मुलाचे नाव हिंदू धर्माप्रमाणेच असावे असा आग्रही सूरही आळवला. साऱ्या चर्चांच्या वलयामध्ये तैमूर मात्र भलताच प्रसिद्धीझोतात आला ही बाबही महत्त्वाची.         


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub