वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला ठाकरे सरकारचा धक्का

वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला ठाकरे सरकारचा धक्का

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र राज्य सरकारला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिले असून, वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला धक्का लागणार आहे.

गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा झाली. या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळातील वीजबिलांची थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊतांची संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील माहिती सादर केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झटका दिल्याचे बोलंले जात आहे.

एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद आता रंगताना दिसत आहे. दरम्यान, वीज बिले कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरले, हे विश्वासघातकी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती, तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जा मंत्ती नितीन राऊत यांनी केला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *