दसऱ्याआधी मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस!

दसऱ्याआधी मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत असून, कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे संकंट असल्यामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सणासुदीच्या कालखंडात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या अराजपत्रीय अधिकाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोनस देण्याच्या या केंद्र सरकारच्या निर्णयावर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास 30 लाख नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने प्रॉडक्टिव्हिटी आणि नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. दरवर्षी बोनस देण्याचा निर्णय हा दसऱ्याच्या आधी घेतला जातो. पण कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीत चालल्याने या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल का नाही याबाबतीत संभ्रम होता, आता मात्र तो दुर झाला आहे.

केंद्र सरकार देत असलेला बोनस दसऱ्याच्या आधी एकरकमी थेट लाभ हस्तांतर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 3,737 करोड रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यामध्ये रेल्वे, पोस्ट ऑफिस, इपीएफओ च्या 17 लाख कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी बोनस आणि 13 लाख कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी बोनस मिळणार आहे.या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर पंचायती राज अधिनियम, 1989 लागू करण्याचाही निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील तीनस्तरीय रचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *