60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून, आता लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवार दि. 1 मार्च पासून सुरू होत आहे. दरम्यान, आता सामान्यनागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सोमवार दि. 1 मार्च पासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरू करण्यात आला असून, या टप्प्यात नागरिकांना लसीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार असून, लसीकरणासाठी कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 रूपये नागरिकांना द्यावे लागतील.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लस देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीतील एम्स रूग्णालयात पोहचले. तिथे त्यांनी भारत बायोटेकची को-वॅक्सिन ही लस टोचून घेतली. दरम्यान, देशभरात सोमवार दि. 1 मार्च पासून कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षापुढील व्यक्तींना तथा 45 वर्षापुढील नागरिकांना लस दिली जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय 71 वर्षे आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub