कोरोना विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर

कोरोना विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरस विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. भारताने लशीकरणामध्ये कोणाला प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे? त्यांची निवड करायला सुरुवात केली आहे.

आघाडीवर राहून कोरोनाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, को-मोर्बिडीटी असणारे लोक आणि वयोवृद्धांना लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य मिळू शकते. प्राधान्यक्रमाच्या यादीत एकूण चारगट आहेत. यात 50 ते 70 लाख आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आहेत. पोलीस, महापालिका कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान-अधिकारी असे मिळून दोन कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. 50 वर्षापुढील 26 कोटी नागरिक आणि 50 पेक्षा कमी वय पण को-मोर्बिडीटी असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.

देशात कोरोना व्हायरस विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर आली असून, लशीकरणामध्ये कोणाला प्राधान्य मिळाले पाहिजे त्यांची निवड करायला सुरुवात केली आहे. देशात जवळपास 30 कोटी लोकांना लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य मिळणार असून, देशात सध्या तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहे. यात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस सर्वात शेवटच्या म्हणजे तिसऱ्या फेजमध्ये आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात या लसीच्या फेज तीनचा डाटा उपलब्ध होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *