राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तराखंड उच्च न्यायालयाची नोटीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तराखंड उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सुट दिली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील ठाकरे सरकारवर अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले, तसेच राज्यात राजकीय दंगल देखील पाहण्यास मिळाली. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

आदेशानंतरही सुविधांची थकबाकी न दिल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नोटीस बजावली. यासोबतच विविध सोई सुविधांच्या थकबाकी न भरल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, माजी मुख्यमंत्री सी.सी. खंडूरी यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या नोटींसींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर केंद्रीय शिक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या वीज, पाणी थकबाकीसाठी तसेच 11 लाख रुपये आणि आणखी काही रक्कम जमा न केल्याबद्दल अतिरिक्त सचिव देपेन्द्र चौधरी यांनाही उत्तराखंड उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

कलम 361 नुसार आरएलएसीने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नोटीस पाठविली होती. कलम 361 नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी दोन महिने आधी माहिती देणे आवश्यक असते. 10 ऑक्टोबर रोजी दोन महिने पूर्ण झाल्यानंतर रुलेकने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार कोश्यारी यांच्यावर 47 लाख 57 हजार 758 रुपयांची थकबाकी आहे. बुधवारी न्यायमूर्ती शरद कुमार शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानुसार कोर्टाने राज्यपाल कोश्यारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *