ईद-ए-मिलाद साध्यापणाने साजरी करावी : राज्य सरकार

ईद-ए-मिलाद साध्यापणाने साजरी करावी : राज्य सरकार

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या असून, कोरोनाचे संकंट असल्यामुळे राज्यात यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होणार आहे. दरम्यान, या वर्षीची ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साध्यापणाने साजरी करावी असे राज्य सरकारने सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केले आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारने सर्व मुस्लिम बांधवांना या वर्षीची ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साध्यापणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्या संबंधीची मार्गदर्शक सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात असे म्हंटले आहे की, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे इतर धार्मिक सणांप्रमाणे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) घरात राहूनच साजरी करावी. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईदच्या मिरवणूकीला परवानगी देण्यात येत नाही. परंतु प्रतिकात्मक स्वरुपात मुंबई येथील खिलाफत हाऊस येथे 10 लोकांसह एक ट्रकला परवानगी देण्यात येत आहे.

ईद निमित्त मुस्लिम वस्तीत मोहंमद पैगंबर यांच्या स्मरणार्थ काही ठिकाणी सबील अर्थात तात्पुरत्या स्वरुपाची पाणपोई लावण्यात येते. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. ईद साजरी करताना कोणत्याही परिस्थितीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करू नये. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आयोजित करावी तसेच स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने आखलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल असेही परिपत्रकात म्हंटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *