शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे : मुख्यमंत्री ठाकरे

शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर पासून सुरु झाले असून, मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने मंजुर केलेल्या कृषी विधेयकातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरीही एकत्र आलो पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही. परंतु, आपल्याला या कायद्यांचे आंधळे समर्थनही करायचे नाही. या कायद्यांमधील त्रुटी, उणीव दूर करणे गरजेचे आहे. हे कायदे करण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेऊन तसेच किमान शेतकऱ्यांच्या संघटनांसमवेत अगोदर चर्चा होणे गरजेचे होते. विकास किंवा सुधारणांच्या विरोधात नसल्याचे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, आपला देश हा जगातला सर्वात मोठा कृषीप्रधान देश आहे. हरीतक्रांती झाली तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत याचा देखील विचार करायला हवा. अन्नदात्याला सुखी करायचे असेल तर कायद्यांमध्ये वेळोवेळी सुधारणादेखील करणे आवश्यक असते. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून आराखडा तयार करुन राज्यात कायद्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *