जिंतूरमध्ये पोलिसांकडून शेतकरी तरूणास मारहाण

जिंतूरमध्ये पोलिसांकडून शेतकरी तरूणास मारहाण

जिंतूर (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशातच मात्र, पेरणी तोंडावर आल्याने शेती साहित्य खरेदीसाठी आलेल्या तरुण शेतकऱ्याला पोलिसाने अर्वाच्य शिवीगाळ करत लाथा व थापडबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून, हा प्रकार सोमवार दि. 17 मे रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात घडला आहे.

जिंतूर शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात सोमवार दि. 18 मे रोजी सायंकाळच्या सुमारास संचारबंदी निमित्त कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार यांनी ग्रामीण भागातून शहरात शेतीविषयक साहित्य खरेदीसाठी आलेल्या एका तरुण शेतकऱ्यावा अडवून अर्वाच्च शिवीगाळ करत त्याला एखाद्या सारईत गुन्हेगारासारखी बेदम मारहाण केली. पेकाटात लाथा मारुन कानशिलात लगावली. तसेच लाठीने जबर माराहण केली असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओबद्दल नागरिकांमधून सदरील पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी राज्यातील पोलिस प्रशासनाला सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घेता बळाचा वापर न करण्याचे आदेश दिले असताना, एका जबाबदार पोलिस अधिकाऱ्याने अशा पद्धतीचे वर्तन करणे हे कितपत योग्य आहे.? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून परभणी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना याप्रकाराबद्दल काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन काळात मुभा दिलेल्या व्यक्तीशिवाय ईतर कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरु नये. यासाठी काल प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी कृषीकेंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. मारहाण झालेला तरुण हा शेती विषयक साहित्य खरेदीसाठी शहरात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपावरुन एका फिरत्या कापड व्यापाऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली होती. तर काही दिवसांपुर्वी भरचौकात पोलिस उपनिरीक्षक आणि एका किराणा दुकान व्यापारी यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता पुन्हा या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमधून राग व्यक्त होत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub