कृषी बिल विरोधक शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा

कृषी बिल विरोधक शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोना काळात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारने एक कृषी विधेयक मंजूर केला. या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून, कृषी विधेयका विरोधात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. दरम्यान, सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

पंजाब हरियाणासह अनेक राज्यांमध्ये कृषी विधेयकांवरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, कृषी बिलाच्या विरोधातील आंदोलकांनी आता दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे दिल्लीमध्ये येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत सरकारच्या वतीने चर्चेचा प्रस्तावही ठेवला, तरी देखील शेतकरी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

दिल्लीच्या वेशीवर धडकलेले हे शेतकरी वादळ त्यामुळे आता कुठल्या वळणावर जाणार? हे महत्त्वाचे आहे. पाच दिवस झाले पण दिल्ली-हरियाणा सीमेवरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले शेतकरी हटायला तयार नाहीत. ऐन थंडीत पाण्याचे फवारे झेलत, हरियाणा सरकारने त्यांना अडवण्यासाठी खोदलेले रस्ते बुजवत, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलत ते दिल्लीवर पोहोचले आहेत. आधी त्यांना दिल्लीत येऊच द्यायचे नाही या निर्धारात असलेले सरकार आता चर्चेच्या तयारीपर्यंत आलेले आहे. पण शेतकरी म्हणतायत आता चर्चा होणार तर ती इथेच, हायवेवरच.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub