जिल्हा परिषदांमध्ये होणार ‘एफएमएस’ प्रणालीचा वापर

जिल्हा परिषदांमध्ये होणार ‘एफएमएस’ प्रणालीचा वापर

सोलापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदांच्या वित्तीय कामकाजात एकसारखेपणा व सुसुत्रता आणण्यासाठी जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम म्हणजेच एफएमएस कार्यान्वीत करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यामध्ये सध्या पंचायत राज पद्धत राबविली जाते. त्यामध्ये जिल्हा परिषद ही सर्वोच्च आहे. दरम्यान, जिल्हा परिषदांमध्ये एफएमएस ही प्रणाली कार्यान्वीत करण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अर्थ विषयक बाबींमध्ये सुरळीतपणा येण्यास मदत होणार आहे.

ग्रामविकास विभागामध्ये अनुदान वाटपासाठी सध्या प्रचलित पद्धतीचा वापर केला जातो. जिल्हा परिषदांमध्ये योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे वार्षिक लेखे प्रशासनाला मुदतीमध्ये सादर करणे आवश्‍यक असते. शासन स्तरावर प्रत्येक जिल्हा परिषदांशी संपर्क साधून हे अहवाल मिळविले जातात. त्यानंतर जिल्हा परिषदनिहाय स्वतंत्रपणे आलेल्या अहवालाचे एकत्रीकरण केले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व वेळही वाया जातो. केंद्रीय योजनांसाठी केंद्राकडून मिळालेल्या निधीच्या वितरण व सनियंत्रणासाठी पब्लिक फायनान्स मॉनिटरींग सिस्टीम (पीएफएमएस) ही प्रणाली विकसीत केली आहे.

दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ‘एफएमएस’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ‘एफएमएस’ ही प्रणाली बॅंक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बॅंकेने विकसीत केली असून, त्याचा वापर जिल्हा परिषदांमध्ये करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या अर्थ विषयक बाबींमध्ये सुरळीतपणा येण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली युनीकोडमध्ये (मराठी) असल्याने कर्मचाऱ्यांना हाताळणे देखील सोपे जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभाग व बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामंजस्य करार झाला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *