आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या : मनसे

आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या : मनसे

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे आयोजन युएईत केले. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांविनाच सामने खेळले जात असून, आयपीएलला 19 सप्टेंबर पासून सूरूवात झाली आहे. आयपीएलचा घमासान सुरू झाल्यापासून क्रिकेट प्रेमींना एकामागून एक थरारक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसे ने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवले असून, यासंदर्भातील माहिती मनसेचे केतन नाईक यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासंदर्भातील मोहिमेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवले आहे. हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पाठवले आहे.

सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत असून, आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे, असे असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच पत्राच्या शेवटी कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी,’ असेही मनसेने म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *