आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये रेडक्रॉसकडे देणार : राजेश टोपे

आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये रेडक्रॉसकडे देणार : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले. त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था अथवा रेड क्रॉस सोसायटी कडे हस्तांतर करणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात सदिच्छा भेट दिली, यावेळी बोलताना ते म्हणाले की, व्यवस्थापनामध्ये बदल केल्यास चांगले परिणाम होतात याचे महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे उदाहरण म्हणता येईल. खूप प्रयत्न करूनही आरोग्यसेवा पोहोचविणे कठीण जाते. त्यामुळे अलीकडे राज्यशासनाने येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर रुग्णालयाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहेत. मानांकनात महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा वरचा क्रमांक आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, राज्यात आधुनिक सुविधा असलेल्या 102 क्रमांकाच्या पाचशे रुग्णवाहिका नव्याने घेणार आहे. महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने सर्व स्तरातील पर्यटक येत असल्याने महाबळेश्वरला रुग्णवाहिका पुरविली जाईल. ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे परंतु तेथील अतिदक्षता विभाग सुरू नाही त्या ठिकाणचा अतिदक्षता विभाग सुरू करावा व त्यासाठी बिल आकारण्याची परवानगी संस्थांना देण्याचा विचार आहे. प्रशासन व ग्रामीण रुग्णालय यांच्यात केवळ एका वर्षाचा करार केला जातो पुढील पाच वर्षासाठी हे रुग्णालय रेड क्रॉस सोसायटी व संस्थेकडेच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *