केंद्राने मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू : नवाब मलिक

केंद्राने मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशातसहीत राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार वारंवार केंद्राकडे पुरवठ्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्राने मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू, असा इशारा दिला आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार यासाठी वारंवार केंद्राकडे पुरवठ्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना सांगितले की, तुम्ही महाराष्ट्राला औषधी द्यायच्या नाहीत, औषधी दिल्या तर तुमच्यावर कारवाई करू. ही काय परिस्थिती या देशात केंद्र सरकारने निर्माण केली?

नवाब मलिक पुढे म्हणाले की, आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तत्काळ आपण लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही जी औषधी आहेत, त्यांना विकण्याची परवानगी आम्हाला द्या. जर तुम्ही दिले नाही तर आम्ही ही सगळी औषधे जी महाराष्ट्राच्या जमिनीवर आहेत, निश्चितरूपाने एफडीएच्या मंत्र्याच्या माध्यमातून तो विभाग सीझ करू व जनतेला वाटप करण्याचे काम करू, याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. तसेच, अशीच परिस्थिती या देशात ऑक्सिजनच्याबाबत देखील आहे. महाराष्ट्रात आम्हाला कुठंतरी 1400 किलो लिटर्सची गरज असताना, एकंदरीत 1250 किलो लिटर्सची महाराष्ट्रात उत्पादन क्षमता आहे. जो कमी साठा आहे, तो कुठंतरी केंद्राची जबाबदारी आहे की, देशातील सर्व स्टील प्लॅन्टची उत्पादन क्षमता कमी केली पाहिजे. तिकडचा जो ऑक्सिजनचा साठा आहे, तो या कामासाठी वापरला पाहिजे. असं देखील मलिक यांनी यावेळी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub