विरूष्काचा बाळ ऑस्ट्रेलियात जन्माला आला तर…

विरूष्काचा बाळ ऑस्ट्रेलियात जन्माला आला तर…

नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे आयोजन युएईत केले होते. आता मात्र आयपीएल संपले असून, 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला असून, सध्या संपूर्ण संघ क्वारंटाईन आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये अनुष्का-विराटला अपत्यप्राप्ती होणार असून, विरूष्काचा बाळ जर ऑस्ट्रेलियात जन्माला आला तर त्याला ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळेल.

भारतीय संघाचा 27 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार असून, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. तर कसोटी मालिकेचा पहिला सामना हा डे-नाईट खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी झाल्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारीमध्ये अनुष्का-विराटला अपत्यप्राप्ती होणार असल्याने तो डिसेंबरअखेरीसच ऑस्ट्रेलियातून प्रयाण करणार आहे. याचदरम्यान विरूष्काच्या बाळाला आम्ही नागरिकत्व देवूत असे मजेशीर मत बॉर्डर यांनी व्यक्त केले.

बॉर्डर म्हणाले की, विराट कोहली हा खूप आक्रमक क्रिकेटपटू आहे. मैदानावर त्याचा वावरही तसाच असतो. सध्या कोहलीसारखे दिग्गज खेळाडू आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे बडे संघ यांच्यात हातात कसोटी क्रिकेटचे भवितव्य आहे. विराट कसोटी मालिकेतून मध्येच माघार घेऊन जाणार असल्याचे मला समजले. आम्ही असा अंदाज बांधला होता की त्याचे बाळ हे ऑस्ट्रेलियात जन्माला येईल आणि मग आम्ही त्या बाळाला नागरिकत्व देऊन थेट ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू, असे मजेशीर मत बॉर्डर यांनी व्यक्त केले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub