आयपीएल चौदासाठी आठही संघांनी एकूण 140 खेळाडूंना केले रिटेन

आयपीएल चौदासाठी आठही संघांनी एकूण 140 खेळाडूंना केले रिटेन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले होते. आयपीएलचा तेरावा हंगामा जिंकून मुंबई इंडियंन्सने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 2021मध्ये होणारी आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याचे बोलले जात असून, बुधवार दि. 20 जानेवारी रोजी आयपीएल चौदासाठी आठही संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. सर्व आठही संघांनी मिळून एकूण 140 खेळाडूंना रिटेन केले असून, 55 खेळाडूंना रिलीज केले आहे.

आयपीएलचा तेरावा हंगामा जिंकणाऱ्या मुंबई इंडियंसने रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, क्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कीरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान या खेळाडूंना रिटेन केले आहे. तर श्रीलंकेचा महान खेळाडू लसिथ मलिंगाने रिटायरमेंटची घोषणा केली असून, मिचेल मॅक्लेनाघन, नाथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेरेफेन रदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमख या खेळाडूंना रिलीज केले आहे.

आयपीएलची सर्वात यशस्वी टीम असणारी चेन्नई सुपर किंग्स या फ्रॅन्चायजीने एमएस धोनी, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, रविंद्र जडेजा, सॅम कर्रन, ड्वेन ब्रावो, मिशेल सैंटनर, शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड, एन जगदीशन, इमरान ताहिर, दीपक चाहर, जोश हेजलवुड आणि लुंगी नगिदी या खेळाडूंना रिटेन केले आहे. तर पीयुष चावला, मुरली विजय, हरभजन सिंह, मोनू कुमार सिंह आणि शेन वॉटसन या खेळाडूंना रिलीज केले असून, वॉटसनने आपल्या रिटायरमेंटची घोषणा केली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

रिटेन खेळाडू : इयोन मोर्गन, शुभमन गिल, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारेन, पेंट कमिंस, वरुण चक्रवर्ती, नीतिश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, टिम सेफर्ट आणि रिंकू सिंह.

रिलीज खेळाडू : टॉम बँटन, निखिल नाईक, क्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ आणि हॅरी गुर्नी.

दिल्ली कॅपिटल्स

रिटेन खेळाडू : श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, कगीसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, प्रवीण दूबे, ललीत यादव, हर्षल पटेल, डेनियल सॅम्स आणि क्रिस वोक्स.

रिलीज खेळाडू : जेसन रॉय, संदीप लामिछाने, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल आणि एलेक्स कॅरी.

राजस्थान रॉयल्स

रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा.

रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, शशांक सिंह, आकाश सिंह, वरुण आरोन, टॉम कर्रन आणि अनिरुद्ध जोशी.

सनराइजर्स हैदराबाद

रिटेन खेळाडू : डेविड वॉर्नर, केन विलियमसन, मनीष पांडे, प्रीयम गर्ग, विराट सिंह, ऋद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवस्तव गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, शॉन मार्श, जेसन होल्डर, अभीषेक शर्मा, मोहम्मद समद, भुवनेश्वर शर्मा, राशिद खान, टी नटराजन, संदीप सिंह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थंपी आणि शहबाज नदीम.

रिलीज खेळाडू : बिली स्‍टानलेक, फैबियन एलन, बवांका संदीप, संजय यादव आणि पृथ्‍वी राज.

किंग्स इलेवन पंजाब

रिटेन खेळाडू : केएल राहुल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, मंदीप सिंह, मयंक अग्रवाल, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह, दीपक हुड्डा, सरफराज खान, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, इशान पोरल, हरप्रीत सिंह.

रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, के गौतम, मुजीब उर रहमान, करुण नायर आणि जेम्स नीशम.

रॉयल चैलेंजर्स बंगळुरू

रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम जैम्पा, शहबाज अहमद, जोश फीलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे.

रिलीज खेळाडू : मोइन अली, शिवम दूबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच, क्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उदाना आणि उमेश यादव.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub