इस्रायल मध्ये मास्क घालण्यावरील निर्बंध उठवले!

इस्रायल मध्ये मास्क घालण्यावरील निर्बंध उठवले!

इस्रायल : सध्या संपूर्ण जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक देशांसहीत भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असून, दिल्लीत देखील 6 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर काही राज्यांनी आठवडी लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. असे असताना इस्रायल मध्ये मात्र, स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे.

भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना मात्र, भारताच्या तुलनेत इतर देशांमध्ये स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. इस्रायलने तर आता सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असे जाहीर केले आहे. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणे बंधनकारक असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असेही स्पष्ट करण्यात आले असून, लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवले आहे.

इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणं बंधनकारक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं येत्या मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी इस्रायलमध्ये 8 लाख 36 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र होते. त्यापैकी 6 हजार 331 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 53 टक्के जनतेचे लसीकरण केल्याचे इस्रायलच्या आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. इस्रायलने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub