जलजीवन मिशन योजनेत महाराष्ट्र 11 व्या स्थानी!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, देशात लसीकरणाला देखील सूरूवात झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करायचा आहे. या योजनेत देशात सध्या गोवा पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात 1 कोटी 42 लाख 36 हजार 135 घरांपैकी रविवार दि. 17 जानेवारी 2021 पर्यंत 83 लाख 20 हजार 525 कुटुंबांकडे नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करायचा आहे. या योजनेत देशात सध्या गोवा पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या स्थानावर तेलंगणा, तिसऱ्या स्थानावर पुदुच्चेरी, चौथ्या स्थानावर हरियाणा, पाचव्या क्रमांकावर अंदमान/निकोबार आणि त्यानंतर गुजरात, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, पंजाब, बिहार आणि महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक आहे. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे 2009-2010 पासून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम राबवला जात होता. या योजनेला जलजीवन मिशनमध्ये परावर्तित करण्यात आले.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेनुसार 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे प्रतिदिवस प्रतिकुटुंब 55 लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते. जुलै 2019 पासून या योजनेला गती देण्यात आली आहे. जलजीवन मिशन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात ग्रामीण भागातील घरांमध्ये 31 लाख 12 हजार 762 नळजोडण्या होत्या. मात्र त्यानंतर चार महिन्यांत गतीने काम झाल्याने यात कमालीची वाढ झाली. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शाळा, अंगणवाड्यांमध्ये नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.