जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमामांचे पंतप्रधान मोदींना पत्र!

जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमामांचे पंतप्रधान मोदींना पत्र!

दिल्ली (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून हंगामात सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावणार आहे. मान्सुनच्या पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी मौसमी तथा वादळी वारे देखील सूरू झालेले आहेत. दरम्यान, शुक्रवार दि. 4 जून रोजी आलेल्या वादळामुळे दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदिच्या एका मिनारचा स्लॅब कोसळला. यामुळे मशिदेचे शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित या ऐतिहासिक मशिदीची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.

दिल्लीत शुक्रवारी आलेल्या वादळामुळे जामा मशिदिच्या एका मिनारचा स्लॅब कोसळला. यामुळे खालच्या फरशीचेदेखील नुकसान झाले असून, भारतीय पुरातत्व विभागाने स्मारकाची पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करावे यासाठी मशिदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी रविवार दि. 6 जून रोजी पंतप्रधानांना पत्र लिहित मशिदीच्या दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. बुखारी यांनी पडलेल्या दगडांचे, झालेल्या नुकसानाचे आणि मिनारच्या जीर्ण अवस्थेचे फोटोही या पत्रासोबत जोडले आहेत.

बुखारी यांनी पत्रात लिहिले की, जामा मशिदीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. गेल्या 50 वर्षांपासून मिनारांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही काम करण्यात आले नाही. दुरुस्तीचे काम कधी कधी करण्यात येत पण मशिदिची आता भारतीय पुरातत्व विभागाने पाहणी करणे आवश्यक आहे. स्मारकाचे अनेक दगड जीर्ण अवस्थेत आहेत आणि बऱ्याचदा ते खाली पडतात. शुक्रवारी देखील मिनारवरुन काही दगड पडले, परंतु लॉकडाऊनमुळे मशिद बंद असल्याने मोठा अपघात टळला, असे बुखारी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub