‘सत्यमेव जयते 2’मध्ये जॉन साकारणार डबल रोल

‘सत्यमेव जयते 2’मध्ये जॉन साकारणार डबल रोल

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात नियम आणि अटींसह चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली आहे. अलिकडेच ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन 1984’ या हॉलिवूडच्या चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ या चित्रपटाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये जॉन अब्राहम डबल रोलमध्ये दिसणार असून, एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. तर, दुसर्‍या भूमिकेत तो शत्रूंना ठिकाण्यावर लावताना दिसेल.

देशात अनलॉकिंग झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी चित्रिकरणांना सुरूवात झाली असून, अनेक चित्रपट हे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटांच्या चित्रिकरणात सगळे कलाकार आता बिझी झाले असून, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पासून ते सुपरस्टार रजनीकांत देखील याला अपवाद नाही. दरम्यान, जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सुपरहीट चित्रपटाचा सीक्वल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या सिनेमात जॉन डबल रोल करणार आहे. ‘सत्यमेव जयते 2’ साठी जॉनने 10 ते 12 किलो वजन देखील कमी केले आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी इंस्टाग्रामवर ‘हा हात नव्हे, जॉन अब्राहमचा हातोडा’ असे कॅप्शन देत ‘सत्यमेव जयते 2’च्या सेटवरच्या जॉन अब्राहमच्या हाताचा एक फोटो शेअर केला होता. दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये जॉन अब्राहम सत्याग्रह आणि हिंसा यामाध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवताना दिसणार आहे. हा चित्रपट ऍक्शनने भरपूर असून, यासाठी जॉनने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मे महिन्यात 12 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub