जॉनी लिव्हरचा भारती सिंह आणि हर्षला सल्ला!

जॉनी लिव्हरचा भारती सिंह आणि हर्षला सल्ला!

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करित असून, हा तपास अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत आला आहे. यासाठी रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती. रियाने दिलेल्या जबाबात सिनेइंडस्ट्री मधिल काही मोठी नावे समोर आली असून, यात आता प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा नाव देखील जुडला आहे. शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी धाड टाकली. त्यानंतर दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमिवर, जॉनी लिव्हरनेे भारती आणि हर्षला सल्ला दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावे यात समोर आली आहेत. त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथक कृतीशील झाल्याचे दिसत आहे. शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी एनसीबीच्या पथकाने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. दरम्यान, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने त्यांना ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तीचा पती हर्ष या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी यावर अभिनेता संजय दत्तचे उदाहरण देत प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की, मी भारती आणि हर्षला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुमच्यासोबत काम करणाऱ्या छोट्या आणि मोठ्या कलाकारांना ड्रग्जचे सेवन न करण्याचा सल्ला द्या. तसेच ते पुढे म्हणाले की, संजय दत्तकडे पाहा, त्याने त्याची चूक संपूर्ण जगासमोर मान्य केली. यापेक्षा मोठे उदाहरण काय हवे? तुमची चूक मान्य करा आणि ड्रग्ज सोडण्याचा निर्णय घ्या.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub