कर्नाटक राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी

कर्नाटक राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी

कर्नाटक : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली असून, चीन सोबतच्या सीमावादावरून केंद्र सरकारने अनेक चीनी ऍपवर बंदी घातली आहे, यात बहूचर्चीत असलेल्या पबजी मोबाईलचा देखील समावेश आहे. दरम्यान, इंटरनेटवर सध्या ऑनलाईन गेम्सची लाट आली आहे, हजारो गेम इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लहानग्यांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांना असे गेम खेळायची सवय लागलेली आहे. पण, ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, ऑनलाईन गेम्सच्या नादात नागरिकांकडून कष्टाने कमावलेल्या पैशांचा अपव्यय होत आहे, त्यामुळे राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोम्मई पुढे म्हणाले की, ऑनलाईन गेम्सबाबत पालकांच्या तसेच अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यात अशाप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये यासाठी ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार केला जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जगभर तसेच आपल्या देशात विद्यार्थी, लहान मुले, मुली दिवसभर गेम खेळण्यात व्यस्त असतात. इतकेच नाही तर मोठ्या व्यक्तीही ऑनलाईन गेम्सवर बरेच पैसे वाया घालवतात, हा एकप्रकारचा जुगार झाला आहे. ऑनलाईन गेम्समुळे अनेक कुटुंब त्रस्त असून त्यांची कमाई वाया जात आहे, त्यामुळे कर्नाटक सरकार या गेम्सवर बंदी आणण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. बंदी घालण्यासाठी ज्या राज्यांनी ऑनलाईन गेम्सवर यापूर्वीच बंदी आणली आहे, त्या राज्यांकडून सूचना मागवण्यात येतील, अशी माहितीही बसवराज बोम्मई यांनी दिली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub