आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त!

आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त!

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार दि. 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून संपूर्ण राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त असल्याचे समोर आले असून, एका अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहे.

आळस हा माणसांचा शत्रू आहे, असे शालेय जीवनापासूनच ऐकायला मिळते. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असेही सांगितले जाते. पण, आता ही आळशीवृत्तीच कोरोना मृत्यूच कारण ठरू शकणार आहे. दरम्यान, व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणे सोडून दिले. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावे लागत असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावे लागत आहे, असे नव्या अभ्यासात दिसून आले आहे.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचे या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. या संशोधनासाठी 50 हजार कोरोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला असून, शारीरिक हालचाल न करणे, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा 48 हजार 440 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. काहींना आयसीयूत भरती करावे लागले, काहींचा मृत्यू झालेला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub