घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा 25 रुपयांची वाढ!

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा 25 रुपयांची वाढ!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मात्र, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली असून, ती अद्याप सुरूच असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीही सातत्याने वाढत असल्यामुळे लोकांना महामाईची मार सोसावी लागत आहे.

पेट्रोल-डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला होता. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा एक मार्च पासून घरगुती गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता 14.2 किलोग्रॅम सिलिंडरची किंमत 819 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये सब्सिडी आणि कमर्शियल अशा दोन्ही गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. सब्सिडी असणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढल्यामुळे 845.50 रुपये झाले आहे. तर दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 19 रुपयांनी वाढली आहे.  

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे आधिच हाल होत आहेत. आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीतही सात्त्याने वाढत असल्याने लोकांना येत्या काळात महामाईची मार सोसावी लागणार आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये 1 डिसेंबरपासून आतापर्यंत गॅस सिलिंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे. 1 डिसेंबरला गॅसची किंमत 594 रुपयांवरुन 644 रुपये झाली होती. त्यानंतर 1 जानेवारीला सिलिंडरची किंमत 649 रुपये झाली, त्यानंतर 4 फेब्रुवारीला 719 रुपये आणि 15 फेब्रुवारीला 719 रुपयांवरुन 769 रुपयांवर किंमत गेले. त्यानंतर पुन्हा एकदा 25 फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या होत्या, त्यामुळे किंमत 794 रुपये झाली.

आता 1 मार्चला गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा 25 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किंमती ह्या 819 रुपये झाल्या आहेत. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमती 835 रुपये झाल्या आहेत. दिल्लीमध्ये 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ही 1 हजार 614 रुपये झाली आहे. याआधी सिलिंडरची किंमत ही 1 हजार 523.50 रुपये होती. तसेच मुंबईमध्ये सध्यास्थितीला 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत ही 1 हजार 563.50 रुपये आहे. तर चेन्नईत 1730.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1681.50 रुपये झाली आहे. वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub