मदिना एज्युकेशन संस्था संचलित शाळेच्या जागेवरील अतिक्रमणाविरूध संस्था चालक गेले शासन दरबारी

मदिना एज्युकेशन संस्था संचलित शाळेच्या जागेवरील अतिक्रमणाविरूध संस्था चालक गेले शासन दरबारी

परभणी (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, त्यातील एक घटना मदिना नगर, परभणी येथे देखील घडली आहे. मदिना नगर येथील मदिना एज्युकेशन सोसायटी संचलित शाळेत श्री. ईसा मौलाना यांनी बेकायदेशिर अनाधिकृत प्रवेश करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमाणाविरूध्द संस्था चालक तथा सचिव सौ. नुझहत खान समवेत अनजार खान व इतर यांनी शासन दरबारी हजेरी लावली असून, परभणी जिल्हाधिकरी दीपक मुगळीकर यांना भेटून निवेदन दिले आहे.

मदिना नगर येथील मदिना एज्युकेशन सोसायटी संचलित शाळेसाठी नगरपालिका, परभणी कडून ठराव क्रं.171 दि. 29 एप्रिल 1995 रोजी जागा देण्यात आली व त्याचा करासहीत संस्थेस पत्र ही मिळाले आहे. संस्थेने त्या जागेवर शाळेसाठी पाच रूम व कार्यालय तथा दोन मुतारी आणि संडासचे बांधकाम केलेले आहे. शाळेत पाणीसाठी हातपंपची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 200×200 फुटाचे शालेय क्रिडांगणही तयार केले आहे. परंतु, वर्ष 2012 मे महिन्यात श्री. ईसा मौलाना यांनी शाळेचा गेट व प्रत्येक रूमचे कुलूप तोडून बेकायदेशिर अनाधिकृत प्रवेश करून अतिक्रमण केले.

श्री. ईसा मौलाना यांनी शाळेतील खोल्या मधील कपाट, घंटी, खुर्च्या, टेबल व बैंचेस इत्यादी घेतले असून, कपाट मधील संस्थेचे व संस्था संचलित शाळेचे रेकार्ड, राष्ट्रध्वज, दोरी व ईतर वस्तुंवर देखील कबजा केला आहे. या विरूद्ध संस्था सचिव सौ. नुझहत खान यांनी परभणी महानगर पालिका व पोलीस खात्यात अनेक पत्र देवून अतिक्रमण हटविण्यासाठी विनंती केली. परुतु, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दि. 30 मार्च 2021 रोजी मा.खासदार श्री.तुकारामजी रेंगे पाटील यांच्या उपस्थितीत संस्था सचिव सौ. नुझहत खान, अनजार खान व ईतर मंडळींनी मा. जिल्हाधिकारी साहेब, परभणी यांना भेटून निवेदन दिले. मा. जिल्हाधिकारी यांनी मा. आयुक्त, परभणी महानगर पालिका यांना चौकशीच्या आदेशाचे पत्र दिले असून, या प्रकरणी श्री. सरनाईक उप आयुक्त प्रभाग ‘अ’ चौकशी करीत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub