पंतप्रधान मोदी मंगळवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

पंतप्रधान मोदी मंगळवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले. त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. दरम्यान, देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत असून, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच मंगळवार दि. 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून, सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेक राज्यांसोबत बैठक घेतली आहे. सध्यास्थितीत काही राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. काही शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यूही लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवार दि. 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचे आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार असून, सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे. असा तर्क आहे की, या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाबाबत चर्चा होऊ शकते.

देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 91 लाखांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांमध्ये वाढ होण्याची संख्या असेलेल्या देशांमध्ये जगभरात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारताचा जगभरात पाचवा क्रमांक लागतो. दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच पंतप्रधान मोदी पुन्हा देशव्यापी संचारबंदीचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्षे लागले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub