परभणीत देशातील सर्वात महाग पेट्रोल!

परभणीत देशातील सर्वात महाग पेट्रोल!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशातच मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी बुधवार दि. 12 मे रोजी पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. यादरम्यान इंधन दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले होते. तर निवडणुका दरम्यान चार ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकांनंतर सात दिवसांतच इंधराचे दर गगनाला भिडले असून, महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली असून, परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे.

मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून, आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून, बुधवारी पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. तर परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणीकरांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub