भारती सिंहच्या घरी एनसीबीची धाड!

भारती सिंहच्या घरी एनसीबीची धाड!

मुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून, हा तपास अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत आला आहे. यासाठी रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती. रियाने दिलेल्या जबाबात काही मोठी नावे समोर आली असून, यात आता प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा नाव देखील जुडला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी धाड टाकली.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावे यात समोर आली आहेत. त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथक कृतीशील झाल्याचे दिसत आहे. शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी एनसीबीच्या पथकाने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली असून, ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, एम्स रुग्णालयामधील टीमने सुशांतच्या हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळून त्याने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात 14 जून रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असले तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात हाेता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून, हा तपास अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणावर आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचे सीबीआयचे म्हणने आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub