दिल्लीत नवी संसद बांधकामाची गडबड सुरु

दिल्लीत नवी संसद बांधकामाची गडबड सुरु

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, देशाची संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे. अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराचीही उभारणी सुरु होत असून, दिल्लीत या कामाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. देशाच्या संसद परिसरात बांधकामाची गडबड सुरु झाली असून, नवी संसद बांधण्यासाठी संसद भवनाला सध्या पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त केले जात आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 2022 ला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या आधी नवीन संसदेचे काम पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी बांधकामाची गडबड सुरु झाली असून, नवी संसद बांधण्यासाठी संसद भवनाला सध्या पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त केले जात आहे. तसेच परिसरातील काही ठिकाणची झाडे देखील हलवली जात आहेत. सध्याची जी संसदेची इमारत आहे त्याच्या अगदी समोरच ही सगळी तयारी सुरु झाली असून, गुजरातच्या एचसीपी डिझाईनने याचा आराखडा बनवला आहे. तर टाटा प्रोजेक्ट याचे बांधकाम करणार आहे.

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे. दरम्यान, संसदेची जी आत्ताची इमारत आहे तिला अद्याप शंभर वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. 1927 साली ही ब्रिटीशांनी बांधलेली होती. या जुन्या इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत नवी इमारत उभी राहत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub