दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही : न्यायालय

दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही : न्यायालय

कर्नाटक : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आलेले असून, काही ठिकाणी याचा फायदा देखील झाला आहे. दरम्यान, एखाद्या धर्माच्या प्रमुखांनी किंवा धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या धर्मांची अवहेलना करु नये तसेच कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर सुरु असलेल्या खटल्यावर सूनावणी करताना दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधातली अन्य धर्मांची बदनामी केल्याची फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला. इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला नाही. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही धर्माची बाजू घेत असताना, त्या धर्मप्रमुखांनी किंवा धर्माबद्दल भाष्य करणाऱ्या व्यक्तींनी इतर धर्मांची बदनामी करु नये, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एचपी संदेश यांनी म्हटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर खटला सुरु होता. या महिलेची तक्रा होती की, आरोपी महिलेच्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली. ह्या दोघांनीही भगवद् गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा या दोन आरोपींवर दाखल केला आहे.

महिलेच्या तक्रारीच्या आधारावर दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी अधिक तपास करत आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यानंतर मात्र, आपल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याने हा खटला रद्द करावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या खटल्यावर सूनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेत कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असे सांगत आरोपींची मागणी फेटाळून लावली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub