जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, नवीन बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने परभणीकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मागील एक आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवार दि. 3 ते 10 मे या एक आठवड्यात 5 हजार 88 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 7 हजार 625 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, संपूर्ण आठवड्यात बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत होती. शिवाय रुग्णांच्या मृत्यूमुळेही नागरिकांत धास्ती निर्माण झाली होती. आतापर्यंतच्या रुग्णवाढीचा दर पाहिला तर एका दिवसातील 1400 रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली असून, हा जिल्ह्याचा पीक पॉइंट आहे. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोना संसर्ग ओसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असले तरी मात्र, कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही कमी झाले नाही. दररोज रुग्णांचे मृत्यू होत असून, 3 ते 10 मे या आठ दिवसांमध्ये 118 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub