विरोधक आम्हाला मुद्दा बनवून मत मिळवण्याचा प्रयत्न करतात : असदुद्दीन ओवेसी

विरोधक आम्हाला मुद्दा बनवून मत मिळवण्याचा प्रयत्न करतात : असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाला काही दिवसांपूर्वीच लागले असून, परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झाले. आता मात्र सर्वांचे लक्ष हे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलेले असून, या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, भाजपाची बी टीम असल्याचा आरोप अनेकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षावर होत आले आहेत. यावर ‘मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत’, अशा शब्दांत त्यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व राजकीय पक्ष माझा आणि माझ्या पक्षाचा मुद्दा बनवून त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असतात. बिहारमध्ये काँग्रेसने आमच्यावर आरोप केला की, आम्ही भाजपाची बी टीम असून आम्ही मते कापण्याचे काम केले. इथे हैदराबादमध्ये काँग्रेस म्हणते ओवेसींना नाही तर आम्हाला मतदान करा. तर भाजपाचे दुसरचे काहीतरी चालले आहे. पण मला कुणाचीही फिकीर नाही. या आरोपांप्रमाणे मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत. म्हणजेच विरोधक आम्हाला मुद्दा बनवून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, असे मत ओवेसी यांनी मांडले.

असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, हैदराबादची जनता हे पाहते आहे की, असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष हैदराबादला हरप्रकारे चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब आता जनताच निश्चित करेल. ओवेसी पुढे म्हणाले, अमित शाह हैदराबादच्या जनतेशी खोटे बोलले आणि त्यांना एकाही रुपयाची मदत मिळवून दिली नाही. कर्नाटकातील पूरावेळी त्यांनी निधी दिला अशीच मदत जर हैदराबादच्या पीडितांना मिळाली असती तर प्रत्येक कुटुंबाला 80 हजार रुपये मिळाले असते. पण आपण एकही पैसा दिला नाही आणि आम्हाला प्रश्न विचारता. आम्ही मदत कार्यावेळी ना हिंदू पाहिला ना मुस्लिम. प्रत्येक व्यक्तीची मदत केली, त्यावेळी भाजपा झोपली होती.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub