कंगना विरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश

कंगना विरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सुशांतच्या आत्महत्येपासून सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारवर अक्षेप घेत होती. कायम वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनाच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील तुमकूर कोर्टाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले असून, रमेश नाइल एल यांनी कंगना रनौत हिच्याविरोधात तक्रार दाखल केली.

संसदेत शेतीसंदर्भात तीन विधेयके मंजूर झाल्यानंतर अनेक भागातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यावर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. हे ट्विट पुन्हा ट्विट करताना कंगना म्हणाली, पंतप्रधान मोदीजी, झोपलेल्याला जागे करता येते, गैरसमज झालेल्याला समजावून सांगितले जाऊ शकते. मात्र, झोपण्याचे सोंग घेणाऱ्याला, समजून न घेण्याचा अभिनय करत असेल त्याला आपण समजावून सांगण्याने काय फरक पजणार? होईल का? हे तेच दहशतवादी आहेत, सीएएमुळे एकाचेही नागरिकत्व गेले नाही. मात्र, यांनी रक्ताचे वाट वाहिले.

कंगनाच्या या ट्विटवर भरपूर टीका झाली. त्यानंतर कंगनाने 21 सप्टेंबर रोजी स्पष्टीकरण दिले. ती म्हणाले की, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे नारायणी सैना होती, तसाच पप्पूकडे चंपू सेना आहे, ज्याला फक्त अफवांच्या आधारे लढायचे माहिती आहे. हे माझे मूळ ट्विट आहे, जर कोणी मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले असे सिद्ध केले तर, मी माफी मागून ट्विटर कायमचे सोडेल. या सर्व प्रकरणावर रमेश नाइल एल यांनी कंगना रनौत हिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर कर्नाटकातील एका कोर्टाने अभिनेत्री कंगना विरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *