परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कायम!

परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कायम!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले, त्याचा फटका हा संपूर्ण राज्याला लागला असून, आता देशातील केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांसह महाराष्ट्रात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लूने 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर गावातील तब्बल साडेतीन हजार कोंबड्या मारण्यात आल्या. आता पेडगाव तालुक्यातील कुक्कुटपालक राजेश कलंके यांच्या तब्बल 700 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून, परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे समोर आले आहे.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर सेलु तालुक्यातील कुपटा गावातही बर्ड फ्लूने 500 कोंबड्या दगावल्यानंतर हे गावही प्रतिबंधित जाहीर करून इथल्या एक किलोमीटर अंतरामधील 469 कोंबड्या मारण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे काम सुरु असतानाच परभणीच्या पेडगाव तालुक्यातील कुक्कुटपालक राजेश कलंके यांच्या तब्बल 700 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागासह,जिल्हा प्रशासनाचे पथक गावात पोहोचले असून पुढील उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.

परभणीच्या मुरुंबा गावात बर्ड फ्लूनेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील 1 किलोमीटरच्या परिसरातील उर्वरित साडेतीन हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. यासाठी पशुवैद्यकीय विभागाने अनेक विभागांच्या परवानग्या मिळवल्या त्यानंतर या नष्ट करण्यासाठी एकूण 7 पथके तयार करण्यात आली. अगोदर कोरोना आणि नंतर बर्ड फ्लूने प्रतिबंधित असलेले मुरुंबा गाव पूर्वपदावर येत आहे. आता मात्र, पेडगाव तालुक्यात तब्बल 700 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 6 जानेवारीपासून सुरु झालेल्या बर्ड फ्लूचा संसर्ग कायम असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub