राजधानी दिल्लीत मास्क न घातल्यास 2 हजाराचा दंड

राजधानी दिल्लीत मास्क न घातल्यास 2 हजाराचा दंड

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले. त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, गेल्या काही दिवसांत कोरोनाचा जोर कमी झाला होता. मात्र आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत असून, दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. पूर्वी हा दंड 500 रुपये होता, मात्र कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता तो आता चौपट वाढविण्यात आला आहे.

दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी जाहीर केले की एलजीची भेट घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, सर्वपक्षीय बैठकीत हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली ज्यामध्ये भाजप आणि काँग्रेसनेही भाग घेतला.

गेल्या एका आठवड्यात राजधानी दिल्लीतील कोरोना संसर्गाची प्रकरणे पाहिली तर 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत येथे 43 हजार 109 नवीन प्रकरणे आली आहेत, तर या काळात 715 लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. बुधवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 7 हजार 486 नवीन कोरोना संक्रमीत रुग्णांची नोद झाली. तर, या साथीने 131 लोकांचा मृत्यू झाला असून, कोरोना संक्रमणामुळे दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *