चहाच्या प्लॅस्टिक कपची जागा घेणार पर्यावरणपूरक ‘कुल्हड’

चहाच्या प्लॅस्टिक कपची जागा घेणार पर्यावरणपूरक ‘कुल्हड’

राजस्थान (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सुट दिली जात असून, जवळपास संपूर्ण देश अनलॉक झाले आहे. दरम्यान, आता सर्व रेल्वे स्टेशनवरचे चहाचे प्लॅस्टिक कप हद्दपार होणार असून, त्याची जागा पर्यावरणपूरक कुल्हड घेणार आहेत. रविवारी राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यात एका कार्यक्रमात रेल्वमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

देशात अनलॉकच्या प्रक्रियेनंतर अनेक विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच देशाची परिस्थिती देखील पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, आता देशातील सर्व रेल्वे स्टेशनवरचे चहाचे प्लॅस्टिक कप हद्दपार करण्यात येत असून, त्यांची जागा पर्यावरणपूरक कुल्हड घेणार आहेत. रेल्वेच्या या धोरणामुळे प्लॅस्टिक मुक्त भारताकडे आपण एक पाऊल टाकतोय असे रेल्वमंत्री पियूष गोयल म्हणाले. सुमारे 400 रेल्वे स्टेशनवर आजच्या घडीला चहा हा कुल्हडमधून देण्यात येत आहे. यापुढे चहासाठी केवळ कुल्हडचा वापर करण्याचे धोरण रेल्वेने आखले असल्याचे देखील पियूष गोयल यांनी यावेळी सांगितले आहे.

रेल्वेच्या या धोरणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच त्यामुळे लाखो रोजगारही निर्माण होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी प्लॅस्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय रेल्वेने स्टेशनवर चहासाठी प्लॅस्टिकचा वापर न करता कुल्हडचा वापर करण्याचे ठरवले असून, आता आपणास देशातील प्रत्येक रेल्वेस्टेशनवर चहाच्या प्लॅस्टिक कपांच्या जागी पर्यावरणपूरक कुल्हड दिसणार आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub