पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार!

पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आलेले असून, काही ठिकाणी याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असून, मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार यावेळी सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही देशाला अनेकदा संबोधित केले आहे. तसेच त्या-त्यावेळी अनेक निर्णय जाहीर केले आहेत. अशातच आज संध्याकाळी मोदी देशवासियांना संबोधित करताना काय बोलणार? या संदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केलेली अनेक राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढे काय काळजी घेतली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. अशातच पहिल्या लाटेत देशवासियांसाठी मोदी सरकारने काही आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. अशाच पद्धतीने दुसऱ्या लाटेसाठी काही विशिष्ठ क्षेत्रांसाठी मोदी मोठी घोषणा करु शकतात. तसेच काही विशिष्ट क्षेत्रांसाठी सवलतही जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, जीवघेण्या कोरोना विषाणूने बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. भारतातही चित्र वेगळे नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याचे पाहायला मिळत होते. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीने का असेना पण ओसरत असल्याचे दिसत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub