पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार!

पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत अनेकदा देशाला संबोधित केले आहे. ज्यामध्ये जनता कर्फ्यू, 21 दिवसांचा लॉकडाऊन, कोरोना वॉरियर्ससाठी दिवे लावण्याचेही आवाहन मोदींनी देशाला संबोधित करताना केले होते. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात अनेकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी पंरप्रधानांनी देशात सुरु असलेल्या कोरोनावरील लसींच्या ट्रायलसंदर्भात बैठक घेतली होती. दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असून, पंतप्रधान सतत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले होते की, मोदी सरकारने अर्थव्यवस्थेवर कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव आणि त्यामुळे जीडीपीमध्ये संभाव्य घट यासंदर्भातील आकलन सुरु केले आहे. तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आर्थिक चक्राला चालना देण्यासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंगळवारी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी देशासाठी आणखी एका रिलीफ पॅकेजची घोषणा करणारा का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *