परभणी जिल्ह्यात थॅलेसेमीया आजारास अटकाव

परभणी जिल्ह्यात थॅलेसेमीया आजारास अटकाव

परभणी (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनासोबतच, थॅलेसिमिया या आजाराचे नाव जरी निघाले तरी नवजात शिशुंच्या पालकांच्या ह्रदयात धडकी बसते. या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना महिण्यातून दोन वेळा रक्त बदलावे लागते. परंतू या आजाराला अटकाव करण्यासाठी गेल्या सहा वर्षापासून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचे चांगले फलित आता पहावयास मिळत असून, गतवर्षी जिल्हयात केवळ चार थॅलेसिमियाग्रस्त बालकांनी जन्म घेतला.

थॅलेसेमीया रक्ताचा गंभीर आजार असून, यात जन्माला आल्यापासून साधारणपणे एक वर्षाच्या आत या आजाराचे निदान होते. त्यावेळेपासून सदर बाळाचे दर पंधरा दिवसाला रक्त बदलावे लागते. तरच बाळ जिवंत राहू शकते. असे बाळ जन्माला येऊ नये या करिता लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सहा वर्षापूर्वी थॅलेसेमीया सपोर्ट ग्रुपची स्थापना करून महाविद्यालयीन विध्यार्थीमध्ये या आजराबाबत जनजागृती सुरु केली असून, मिशन 2020 व्हिजन 2025 ह्या मोहिमेच्या माध्यमातून 2025 पर्यंत एकही थॅलेसेमीया मेजर बालकांचा जन्म होणार नाही. हे ध्येय समोर ठेवून जनजागृतीचे काम चालू आहे.

परभणी जिह्यातील सध्यस्थितीत 125 बालके ह्या आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना महिन्यातून दोन वेळेस रक्तसंक्रमन करावे लागते. 5 ते 6 हजाराची औषधे लागतात. सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून शासन पातळीवर प्रयत्न करून या वर्षी सहा जिल्ह्यातील बालकांना ही औषधे मोफत देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात सर्व खाजगी वाहतूक बंद असल्याने बालकांना रक्तसंक्रमन करिता जिल्हा रुग्णालयात येणारी अडचण लक्षात घेऊन तालुकास्तरावर या बालकांचे रक्तसंक्रमन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील आजच्या घडीला एकमेव ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांचे मार्गदर्शनात आर. बी. एस. के. च्या मेडिकल ऑफिसर डॉ. अर्चना भायकर यांनी स्वयंस्फुर्त पुढाकार घेऊन गेल्या दीड वर्षपासून जिंतूर तालुक्यातील 22 बालकांना नियमितपणे रक्तसंक्रमन, रक्तविकार तज्ञामार्फत बालकांची तपासणी करून या बालकांचे आयुष्यमान या कठीण काळात उंचावणे करिता संपूर्ण महाराष्ट्र समोर आदर्श ठेवला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub