पालेभाज्या, फळभाज्यांचे दर पाचपटीने महागले

पालेभाज्या, फळभाज्यांचे दर पाचपटीने महागले

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी किमती वाढविल्या नाहीत. पण हळूहळू पालेभाज्या तथा फळभाज्या यांच्या किमतीत वाढ होऊ लागली. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच आहे. या महागाईत सर्वसामान्य माणूस हैराण झाला असून, कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पट महाग झाली आहे.

कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असा सल्ला डॉक्टर तसेच तज्ज्ञ देत आहेत. मात्र, मार्केटमध्ये गेल्यावर भाज्यांचे भाव हे 4 ते 5 पटीने वाढले असल्याचे समजते. काही अपवाद वगळता सर्वच भाज्या महागल्या असून, तुटपुंज्या बजेटमध्ये ताळमेळ बसविताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच आहे.

कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देताना सामान्यांचे हाल होत आहेत. डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने डाळींच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर तेलाचे देखील दर वाढले आहेत. आता पालेभाज्या तथा फळभाज्या यांच्या किमतीत वाढ झाली असून, यावर मात्र सरकारचे काहीही नियंत्रण नाहीये. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना आता जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *