परतीच्या पावसाचा मराठवाड्याला तडाखा!

परतीच्या पावसाचा मराठवाड्याला तडाखा!

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाचे पीक भुईसपाट झाले तर आल्यासह भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला असून, पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यंदा वेळेवर आलेल्या मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. गेले तीन ते चार महिने दमदार हजेरी लावलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास या वर्षी लांबला आहे. राज्यात यावर्षी धुवाधार पावसाची नोंद झाली असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाचे पीक भुईसपाट झाले. भात, सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचेही नुकसान वाढले आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. या पाच जिल्ह्यांतील 17 मंडळात सोमवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालना जिल्ह्यातील 9, बीड मधील 6 तर औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळाचा समावेश आहे. राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाची हजेरी सूरू असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *