अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर निर्बंध!

अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर निर्बंध!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांवर निर्बध लागू करण्याचा निर्णय रविवार दि. 18 एप्रिल रोजी सरकारने घेतला आहे. त्यानुसार गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात मधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून, त्यांना प्रवासाच्या 48 तासापूर्वीची नकारात्मक कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 30 एप्रिल पर्यंत संचार बंदीची केली आहे. आता मात्र, राज्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांवर देखील निर्बध लागू करण्यात आले असून, गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात मधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना प्रवासाच्या 48 तासापूर्वीची नकारात्मक कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, या राज्यातून येणाऱ्या रेल्वे गाडय़ांची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणास देण्याच्या सूचना रेल्वेला देण्यात आल्या आहे.

केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड ही राज्ये कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तिकीटावरच प्रवास करता येईल.  या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची 48 तासापूर्वीची आरटी-पीसीटी कोरोना चाचणी नकारात्मक असली पाहिजे.  ज्या प्रदेशातून रेल्वे राज्यात प्रवेश करेल, त्या रेल्वेतील प्रवाशांची यादी ते कोणत्या स्थानकावर उतरणार याचा तपशील चार तास अगोदर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळविणे बंधनकारक आहे. राज्यात ज्या स्थानकावर हे प्रवाशी उतरतील तेव्हा त्यांच्याकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसल्यास लगेच प्रतीजन चाचणी करावी. त्यात नकारार्थी अहवाल येणाऱ्यांना 15 दिवस गृहअलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub