आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमान खानच्या चित्राचा समावेश!

आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमान खानच्या चित्राचा समावेश!

मुंबई (प्रतिनिधी) : देशात नियम आणि अटींसह चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली असून, अलिकडेच अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. दरम्यान, अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषीय नव्याने काहीच सांगण्याची आवश्यकता नाही. मागील कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला अभिनयाप्रमाणेच गाण्याची आणि चित्रकलेचीदेखील तितकीच आवड आहे.

सलमान खान याच्या गाण्याची आणि चित्रांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून, त्याने रेखाटलेले एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली असून, त्याने म्हटले की, विचित्र, उदासीनता, अभिमान आणि आनंद असे सारे काही भाव सध्या जाणवत आहेत. माझे काम इतक्या मोठ्या दिग्गज राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर आणि व्ही.एस. गायतोंडे यांच्यासोबत डिस्प्ले होणार आहे. हा सन्मान देण्यासाठी मनापासून आभार, अशी पोस्ट सलमानने शेअर केली आहे.

सलमानने मदर तेरेसा यांच्यावर आधारित एक चित्र रेखाटले आहे. या चित्रावर त्याने स्वाक्षरीदेखील केली आहे. हे चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आले असून, प्रदर्शन 27 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक दिग्गजांचे चित्र ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, सध्या सलामान खान त्याचा आगामी “राधे” आणि “अंतिम” या चित्रपटांमध्ये व्यग्र असून, अंतिम या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान या चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub