लॉकडाउनसंबंधी अमित शाहांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!

लॉकडाउनसंबंधी अमित शाहांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक राज्यांत कठोर निर्बंध करण्यात येत आहेत. तरी मात्र, काही ठिकाणी याचा विसर पडल्याचे दिसून येते, मग त्यात बंगाल मधील प्रचार रॅली असो की हरिद्वार येथील कुंभमेळा. दरम्यान, देशात पुन्हा एकदा गंभीर स्थिती निर्माण झाल्याने लॉकडानसंबंधी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, अनेक राज्यांनीही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान देशात पुन्हा एकदा गंभीर स्थिती झाल्याने लॉकडानसंबंधी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, घाईत लॉकडाउन करण्याची गरज नाही असे वाटत असेल तर ऑक्सिजन तसेच बेड यांच्या तुटवड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर अमित शाह यांनी जाहीर कराव्यात, असे त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाउन करण्याची गरज नाही असे वाटत असेल तर जी माणसे मरत आहेत, ऑक्सिजन तसेच बेडशिवाय तडफडत आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात. दरम्यान, देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचे वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. असे ट्विट संजय राऊत केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub