खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

जळगाव (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या या काळात राज्याला मोठा आर्थिक फटका लागला असून, बेरोजगारी देखील वाढली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या खुप महत्त्वाचा समजला जात आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. भाजपमध्ये अन्याय झाल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता शरद पवार 20 आणि 21 तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

40 वर्ष भाजपमध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील महिन्यात प्रवेश केला. दरम्यान, शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त भाजपमधील अनेक खडसे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यात कोण कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार तसेच हा दौरा उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळकटी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या दौऱ्यात काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub