परभणीत आपत्ती काळात शिवसेनेचा मदत केंद्रामार्फत मदतीचा हात!

परभणीत आपत्ती काळात शिवसेनेचा मदत केंद्रामार्फत मदतीचा हात!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना संकर्मणामुळे संपूर्ण जिल्हा हैराण असून, आपत्तीच्या या काळात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य सल्ला व मदत मिळावी, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना मदत केंद्र स्थापन केले आहे. या मदत केंद्रामार्फत गरजू लोकांना तत्पर सेवा दिली जाणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांसह कुटूंबियांना या आपत्ती काळात अ‍ॅडमीटसह तपासणी, औषधोपचार, तसेच भोजनासह अन्य अडीअडचणीत मदतीकरिता या केंद्रातील शिवसैनिक काम करणार आहेत. वसमत रस्त्यावरील खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयात हे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील वेगवेगळ्या कोविड सेंटरमधील रुग्णांना तातडीची मदत मिळावी यासाठी शिवसैनिकाची फौजच तयार करण्यात आली आहे. या शिवसैनिकाचे मोबाईल नंबर देखील खासदार संजय जाधव यांनी जाहिर केले आहेत.

खासदार संजय जाधव यांनी जाहिर केलेल्या कार्यकर्त्यांची नावे व नंबर :

जिल्हा शासकीय रुग्णालयात बबनराव मुळे (9767106363), करीम हॉस्पीटलमधून महेश येरळकर (9096933359), संतोष कांबळे (7972113309), सचिन मोटे (9823147550), जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटर येथे शेख शब्बीरभाई (9923153242), पाडेला हॉस्पीटल मध्ये बॉबी सूर्यवंशी (9096499971), अमोल कुलथे (9890849949), गजानन दमकोंडे (9403062020), सतीश नारवाणी (9422111110), नावंदर हॉस्पिटल येथे अतुल सरोदे (9422104777), अबोली हॉस्पीटल येथे अंगद अंभुरे (9518950902), स्वाती क्रिटिकल मध्ये रामप्रसाद रणेर (9527437777) तैणात असणार.

तसेच अक्षदा मंगल कार्यालयात प्रदीप भालेराव (9011192224), अंभोरे हॉस्पिटल येथे व्यंकटेश वाघ (9423444692), संदीप देशमुख (9970634063), संजय सारणीकर (9767100358), उमेश वाघमारे, चिरायू हॉस्पिटल मध्ये गंगाप्रसाद आणेराव (9921747777), लाईन लाईन हॉस्पिटल येथे भगवानराव धस (9923179797), लोटस हॉस्पिटल मध्ये विजयसिंह ठाकूर (9823135404), परभणी आयसीयूत विलास अवकाळे (9764332111), अनन्या हॉस्पिटल मध्ये गुणाजी अवकाळे (8208296404), सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे प्रल्हाद चव्हाण (9673806015), सूर्या हॉस्पिटल मध्ये संजय सारणीकर (9921808052) असणार आहेत.

धानोरकर हॉस्पिटल येथे विठ्ठल पंढरे (9527454549) आणि हयात हॉस्पिटल मध्ये भास्कर हेगडे (9766464211), सुभाष आहेर (9511237291), आकाश पांचाळ (7020597300), पिराजी नरवाडे (70201958057), अमोल भिसे (9021132813) आदी कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, या मदत केंद्राव्दारे शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या कुटूंबियांना योग्य ते मार्गदर्शन मिळेलच त्यापाठोपाठ त्यांच्या अडीअडचणी व अऩ्य समस्यासुध्दा सुटतील. सरकारी व खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी तैणात असणार आहेत. संबंधितांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, सर्वतोपरी मदतीचा हात निश्रि्चत मिळेल, असे परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub