कोरोना विरूध्द लढण्यासाठी जीडीपीच्या 10 टक्के खर्च : अर्थमंत्री

कोरोना विरूध्द लढण्यासाठी जीडीपीच्या 10 टक्के खर्च : अर्थमंत्री

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी मात्र कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचे कौतुक सर्वोत्र केले जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या संक्रमणाशी लढण्यासाठी सरकारने देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के प्रोत्साहन पॅकेज दिले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, भारत सरकारने कोरोना विरुध्द लढण्यासाठी देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के प्रोत्साहन पॅकेज दिले असून, कामगार क्षेत्रातही मोठ्या सुधारणा केल्या आहेत. कोरोनाच्या संक्रमणाने विकसनशील तसेच विकसित अर्थव्यवस्थांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. भारताच्याही अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला आहे. सीतारमण यांनी पुढे सांगितले की, भारतात अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने देशातील गरीबीचा स्तर कमी करण्यास यश मिळाले होते परंतु कोरोनाच्या संकटामुळे या लढाईवर परिणाम झाला आहे.

सीतारमण पुढे म्हणाल्या, भारत सरकारने देशातील कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासोबतच त्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सुरवातीला सरकारने 23 बिलियन डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले. त्याद्वारे गरीबांना थेट पैशाचे हस्तांतर आणि अन्न सुरक्षेचे उपाय करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 271 बिलियन डॉलरचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले जे भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के इतके होते.

अर्थमंत्रालयाच्या एका निवेदनाचा दाखला देऊन त्यांनी सांगितले की देशातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक आवश्यक पावले उचलली आहेत. देशातील अनेक कायद्यांत आवश्यक ते बदल करण्यात आले. रेशन कार्डचा देशात कुठेही वापर सुरू करुन स्थलांतरित कामगारांना एक प्रभावी अशी सामाजिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली. कोरोनाच्या या काळात ग्रामीण क्षेत्रात नाबार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. कृषी क्षेत्रात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार सुरक्षा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीच्या रक्कमेत वाढ करुन 27.13 बिलियन डॉलरची मदत देण्यात आली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *