देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य शासनाचा दिलासा

देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य शासनाचा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या या काळात देशाला तसेच राज्याला मोठा आर्थिक फटका लागला असून, अर्थव्यवस्था खालावली आहे. राज्यात तसेच देशात बेरोजगारी देखील वाढली आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर राज्यातील उद्योग हळूहळू सूरू करण्यात आले, बेरोजगार झालेल्या कामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळू लागले. दरम्यान, देहविक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरोनाच्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यात आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून, काही नियम व अटी घालून जवळपास संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्यात आलेले आहे. यातच महाराष्ट्रातील राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा दिला असून, त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये आर्थिक मदत कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल फौजदारी अपिल क्र. 135/2010 या प्रकरणामध्ये वेश्या व्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोरोनाच्या कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबतच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला संवेदनशीलरित्या गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते. गुरूवारी त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, त्यानुसार 32 जिल्ह्यांना एकूण 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करण्यात येत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub