मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : अजित पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून, मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून, यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्य सरकार इतर कोणत्याही वर्गावर अन्याय होऊ न देता आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत  मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षण बद्दल शेवटी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. धक्का देणारा, अशा पद्धतीचा हा निकाल आहे. राज्य सरकार इतर कोणत्याही वर्गावर अन्याय होऊ न देता आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पवार पुढे म्हणाले की, पुढच्या अधिवेशनात किंवा एकदिवसाचे अधिवेशन बोलवायचे असेल, तर एकदिवसाचे अधिवेशन बोलवू. कोरोनाचे हे सावट संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षाला विश्वासात घेऊन पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेण्याची महाविकास आघाडीने मानसिकता ठेवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजीची भावना आहे. 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षणाचा विषय मोदी सरकारच्या अख्त्यारीत येतो, असे सत्ताधारी ठाकरे सरकारचे म्हणणे आहे. त्यावर विरोधी पक्ष भाजपा, सत्ताधारी महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाची बाजू मांडली नाही, असा आरोप भाजपाने केला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात आता आरोप-प्रत्यारोप सूरू झाले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub