मदरशातून दहशतवादी तयार होतात : उषा ठाकूर

मदरशातून दहशतवादी तयार होतात : उषा ठाकूर

मध्य प्रदेश (प्रतिनिधी) : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापत असून, नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांत भर पडत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या मंत्री उषा ठाकूर यांनी मदरशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करावी, कारण सर्व दहशतवादी हे मदरशातूनच तयार होतात असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर देखील टीका केली.

मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुका जवळ येत असून, देशात राजकीय वातावरण बिघडत आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय सभा घेण्यात येत आहे. दरम्यान, इंदूरमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत उषा ठाकूर म्हणाल्या की, मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करायला हवी. वक्फ बोर्ड ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. जर मदरशांना कोणी वैयक्तिक मदत करणार असतील तर त्यांनी ती खुशाल करावी, आपले संविधान त्याला मान्यता देते. पण आम्ही आमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाचा असा अपव्यय करु देणार नाही. तो पैसा विकासासाठी वापरला गेला पाहिजे.

मदरशातील शिक्षणावर टीका करताना त्या म्हणाल्या की, मदरशात ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ते पाहता त्यातून दहशतवादी तयार होतात. त्यामुळे देशविरोधी कारवाया ज्या या मदरशातून तयार होतात, ते बंद करायला हवे आणि जनतेच्या श्रमाचा पैसा हा विकासासाठी वापरण्यात यावा. यावेळी मंत्री उषा ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करत म्हणाल्या की, कमलनाथ यांच्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्या सरकारने मंदिरांवर 10 टक्के जिझिया कर लावला होता. सरकारी तिजोरी भरायच्या उद्देशाने कमलनाथ यांनी हा जिझिया कर लावला आणि धार्मिक अखंडता तोडण्याचा प्रयत्न केला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *